आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा वाढता धोका:अकोला-अमरावतीत पुन्हा लॉकडाऊन, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे घेतला निर्णय

अमरावती / अकोला10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज रात्री 8 वाजेपासून हा लॉकडाऊन असणार आहे.

विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे अकोला आणि अमरावती जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. आज रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. जवळपास 36 तास हे निर्बंध असणार आहेत.

आज रात्री 8 वाजेपासून हा लॉकडाऊन असणार आहे. दरम्यान 36 तासांच्या बंदमुळे लोक आवश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी बाजारात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू असणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा महत्त्वाचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

प्रशासनाकडून वारंवार गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. तरीही जवळपास 36 तासांचे लॉकडाऊन असल्यामुळे लोकांनी बाजारात गर्दी केली आहे. तसेच कोरोनाची भीती कमी झाल्यामुळे लोक आवश्यक काळजी घेत नाहीत. यामुळेच कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...