आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जूनी भांडी नवी करुन देण्याची थाप मारत दागिने पळविले:धामणगावच्या 2 महिलांची लूट; पोलिसांकडून त्या दोघींचा शोध सुरू

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या भांड्यांच्या बदल्यात नवीन भांडी देण्याचे आमिष दाखविणाऱ्या दोन फेरीवाल्या महिलांनी शहरातील दोन गृहिणींचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडीस आली. शिवाजी वार्डमध्ये ही घटना घडली. दरम्यान दागिने पळविणाऱ्या त्या दोन्ही महिलांचा दत्तापुर पोलिसांकडून शोध सुरू असून या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील ज्योती विलास भाकरे (वय 48) या शिवाजी वार्ड येथील सन्मान लॉजच्या मागे राहतात. त्यांचे पती व मुलगा सुमित सकाळी आठ वाजता मजुरीच्या कामाने घराबाहेर पडल्यानंतर घरी दिवसभर त्या एकट्या असतात. मागील चार - पाच दिवसांपासून त्यांच्या शिवाजी वार्ड परिसरात जुन्या भांड्यांच्या बदल्यात नवीन भांडे करून देणाऱ्या दोन महिला फिरत होत्या. दरम्यान या दोन्ही महिला ज्योती भाकरे यांना भेटून तुमच्या घरात असलेल्या जुन्या वस्तू आम्हाला द्या, त्यावर आम्ही त्या नवीन करून तुम्हाला परत देऊ व सोबत एक भेटवस्तू सुद्धा देऊ असे बोलू लागल्या. सुरुवातीला घरातील सहा जुनी स्टील ग्लास दिल्यावर त्यांनी ते नवीन ग्लास दिले व भेट वस्तू म्हणून परत एक अल्युमिनीअमचा डबासुद्धा आणून दिला. त्या फेरीवाल्या महिलांवर ज्योती भाकरे व परिसरात असलेल्या इतरही गृहिणींचा विश्वास बसल्याने घरातील जुनी भांडी देऊन नवीन भांडी घेऊ लागल्या.

असे गंडवले महिलांना

दरम्यान 29 ऑक्टोबरला शनिवारी दुपारी 12 च्या दरम्यान त्या दोन्ही फेरीवाल्या महिला पुन्हा शिवाजी वार्ड परिसरात आल्या. ज्योती भाकरे यांच्याशी बोलणे सुरु असतानाच शेजारी रहात असलेल्या किरण रोकडे यांनी मला दहा हजार रुपयांची गरज असल्याचे असे त्या दोघींना सांगितले. त्यावर आम्ही तुम्हाला दहा हजार रुपये आणून देतो, तुम्ही तुमच्याकडील दागिना द्या, असा पर्याय त्या दोघींनी सुचविला. त्यामुळे किरण रोकडे यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढून त्यांना दिले. त्याचवेळी ज्योती भाकरे यांनीसुद्धा पैशाची गरज असल्याने घरातील सोन्याच्या दोन पोथ, ज्यामध्ये अकरा ग्रामचे डोरलेमणी असून त्याबदल्यात पंचवीस हजार रुपयांची मागणी केली. सदर महिलांनी ही मागणी मान्य करीत दुपारी 4 वाजेपर्यंत पैसे आणून देतो असे सांगितले. परंतु नंतर त्या परतल्याच नाहीत.

फवणूकीचा गुन्हा

29 ऑक्टोबरला फेरीवाल्या दोन महिला परत न आल्याने ज्योती भाकरे व किरण रोकडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दत्तापुर पोलिस स्टेशन गाठले. यावेळी ज्योती भाकरे व किरण रोकडे यांचे एकूण 21 ग्राम सोन्याचे दागिने (अंदाजित किंमत 85 हजार रुपये) लुटून नेल्याच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...