आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचे नुकसान ‎:स्कुल बस अभावी विद्यार्थ्यांचे नुकसान‎

हिवरी6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्कूल बसमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या‎ प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत अनेक वेळा‎ सूचना दिल्या. परंतु कोणत्याही प्रकारची दखल‎ घेतल्या जात नाही. या बाबत विचारणा केली‎ असता, अनेक कारणे सांगण्यात येते. कधी गाडी‎ नादुरुस्त आहे, महिला वाहकास वेळ झाला, गाडी‎ आतमध्ये असल्याने गाडी काढण्यास वेळ लागला‎ तर मशीन नादुरुस्त होती, हे नेहमीचे कारण झाले‎ असल्याने विद्यार्थ्याना तर त्रास आहेच, परंतु‎ प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. अनेक बसेस‎ रस्त्यातच बंद पडलेल्या पहावयास मिळते. बस‎ आर्णी मार्गे सोडल्या जात नाही.

शाळा सुटली की‎ शेकडो विद्यार्थी दोन दोन तास बसच्या प्रतिक्षेत‎ असल्याचे पहावयास मिळते. चौकशी कक्षात‎ विद्यार्थ्याना योग्य माहिती ही दिल्या जात नाही.‎ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन विद्यार्थ्याना‎ योग्य सुविधा देण्यात याव्या, अशी मागणी पालक‎ करीत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...