आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा आयुक्त:लव्ह अंबानगरी फलक; सोनी यांचे नाव काढणार; बेकायदेशीर गोष्टींना थारा नाही

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेकायदेशीर गोष्टींना कोणत्याही स्थितीत थारा देणार नाही. राजकमल चौकातील लव्ह अंबानगरी फलकावरून संकल्पना नगरसेवक प्रणीत सोनी हे नाव काढले जाईल, अशी माहिती मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली. अतिक्रमण विभागाला रात्री नाव काढण्याची स्पष्ट सूचना मनपा आयुक्तांनी दिली. ९ मार्चपासून मनपात प्रशासकांची नियुक्ती आहे. त्यानंतर विना परवानगी जर एखादे काम होत असेल तर त्याला परवानगी मिळणार नाही, असे स्पष्ट केले.

सध्या नगरसेवक नसताना संकल्पने पुढे माजी नगरसेवक न लिहिता केवळ नगरसेवक लिहिण्यात आले. तसेच निधी डीपीसीकडून आला. हा निधी मनपाचाही नाही. मनपाकडे निधी नसल्याने तो डीपीसीकडून आणला गेला आहे. अशात राज शिष्टाचाराचे पालन न करताच फलक लावण्यात आल्यामुळे त्यावरील नाव काढले जाईल.

या प्रकरणी निर्माण झालेला वाद नाव काढल्यानंतर चिघळतो की शांत होतो, ते पुढे कळेलच. कारण माजी नगरसेवक प्रणीत सोनी यांनी आपण नियमांचे पालन करीत नाव टाकल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष काँग्रेसने हे बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...