आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजकमल चौकातील प्रकाशमय लव्ह अंबानगरी या सौंदर्यीकरण फलकाच्या संकल्पनेत माजी नगरसेवक प्रणीत सोनी यांचे नाव आल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. हे राज शिष्टाचाराचे उल्लंघन असल्याचे सांगत मनपाच्या अतिक्रमण विभागाने उशिरा रात्री या फलकावरून ज्यांची संकल्पना आहे, ते नगरसेवक सोनी यांचे नाव काढले. याची माहिती मिळताच भाजप कार्यकर्ते चाैकात पोहोचले व त्यांनी ते नाव पुन्हा जागच्या जागी लावले.
या फलकाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते तर उद्घाटन माजी मंत्री व भाजपचे अमरावती प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सोमवार, दि.९ मे रोजी झाले. व्हिडिओमध्ये जे मॉडेल दाखवण्यात आले होते. त्यात संकल्पना ज्याची आहे, त्याचे नाव असेल असे कुठेही दिसले नाही. हा निधी डीपीसीचा असून त्यातून ते उभे राहिले आहे. त्यामुळे नाव काढले जाईल. मंगळवारी रात्री ते काढण्यात आले. परंतु, भाजप कार्यकर्त्यांनी पुन्हा ते त्या जागी लावले.
यानंतर पुन्हा ते काढले जाईल. जर पुन्हा नाव लावण्याचा प्रयत्न झाला तर कारवाई होईल, असे मनपा प्रशासनाने सांगितले. त्याचवेळी रितसर परवानगी व मंजुरी घेऊनच आपण संकल्पने पुढे नाव लावले. डीपीसीतून पैसे मिळाले. मॉडेलला मनपा शहर अभियंत्यांनीही बघितले. त्यानंतरच राजकमल चौकात ‘लव्ह अंबानगरी’ हे प्रकाशझोतातील फलक उभे राहिले. इतर लोकही त्यांनी एखादे काम केले की नाव लिहितात. मग मी लिहिले तर बिघडले कुठे. आताच का राजशिष्टाचार आठवला, असे मत माजी नगरसेवक प्रणीत सोनी यांनी व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.