आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिपूर्ण अर्ज:महाडीबीटी; विद्यार्थ्यांकडून परिपूर्ण अर्ज भरून घ्यावेत

अमरावती5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या नवीन व नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल २१ सप्टेंबरपासून कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज तात्काळ भरून घ्यावेत, अशी सूचना सहायक आयुक्त माया केदार यांनी केली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीमार्फत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबवल्या जातात.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज तत्काळ सादर करावेत. तसेच पात्र मागासवर्गीय विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी घ्यावी, असे आवाहन केदार यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...