आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गोरक्षणासह बरकत देणारे महाकाली मंदिर

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरीब जोडप्यांचे नि:शुल्क विवाह लावून देणे, गोरक्षण, ‘बरकत’ हे हिंदू स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या तसेच गडगडेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील महाकाली (शक्तीपीठ) मंदिराद्वारे राबवले जाणारे सामाजिक उपक्रम आहेत.

वर्षभरात ६० ते ७० गरीब जोडप्यांचे नि:शुल्क विवाह मंदिराद्वारे लावले जातात. ज्यांच्याकडे लग्न करण्यास पैसे नाहीत, अशा जोडप्यांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाते. एवढेच नव्हे तर विवाहानिमित्त जेवण, वधूला साडीचोळी, वराला पोशाख दिला जातो. देवीपुढे कधी सामूहिक तर कधी एखाद्या जोडप्याचा विवाह केला जातो. ज्यांना विवाह करायचा आहे, त्यांना आधी मंदिर कमिटीची भेट घेऊन माहिती द्यावी लागते. जेवढ्या जोडप्यांनी नोंदणी केली असेल त्यांचा एका शुभ दिवशी विवाह केला जातो.

काम संपले की, अनेकजण गायी, बैल तसेच मोकाट सोडून देतात. त्यांचा सर्वसामान्यांना उपद्रव होऊ नये म्हणून मंदिराद्वारे अशा गायी, बैलांना पकडून आणले जाते. मंदिरात त्यांची सेवा केली जाते. त्यांना नियमितपणे चारा, वैरण, पाणी दिले जाते. मंदिराच्या एका बाजुला सध्या ३० गोवंशांसाठी गोरक्षण तयार करण्यात आले आहे. महाकाली देवीची मूर्ती शेंदूर चर्चित आहे. डोक्यावर मोठा चांदीचा मुकुट व मीना तसेच रंगीत कांचांनी सजवलेला गाभार आहे. शारदीय व चैत्र नवरात्रोत्सवात नियमितपणे हाेम, हवन, महाआरती, महाप्रसाद असे कार्यक्रम घेतले जातात. यासोबतच भजन, प्रवचन, यज्ञाचेही येथे नियमितपणे आयोजन होत असते.

‘बरकत’ वाटण्याची परंपरा
लक्ष्मीपूजनाच्या रात्री ९ वाजेपासून भाविकांना मंदिराद्वारे ‘बरकत’ वाटली जाते. ५० पैशापासून ते ५० रु.पर्यंत ही ‘बरकत’ असते. देवीच्या पुढे ठेवलेले पैसे तिच्या आशीर्वादाने भाविकांना मिळावे, त्यांच्या आयुष्यात वर्षभर सुख, समृद्धी, शांती, आरोग्य नांदावे हाच ही ‘बरकत’ वाटण्यामागील मुख्य उद्देश आहे. ‘बरकत’ घेण्यासाठी १ ते दीड कि.मी.लांब रांग असते. सुमारे १० ते १५ हजार भाविक ‘बरकत’ घेतात. जोवर रांग पूर्ण संपत नाही, तोवर ‘बरकत’ वाटली जाते.

आवश्यकतेनुसार गरजूंना आर्थिक मदत करतो
आम्ही मोठ्या देणग्या देत नाही. कोणी गरजू आले व त्यांना खरेच पैशाची आवश्यकता आहे, खात्री पटली की, मदत करतो. पती-पत्नी दोघे असतील तर मदत दिली जाते.-शक्ती महाराज, प्रमुख, महाकाली मंदिर, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...