आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाप्रसाद‎:संत गोवर्धनदास बाबा पुण्यतिथीनिमित्त आज महाप्रसाद‎

वलगाव‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री संत गोवर्धनदास बाबा यांच्या‎ पुण्यतिथीनिमित्त १५‎ नोव्हेंबरपासून अखंड हरिनाम‎ सप्ताहाला प्रारंभ झाला असून,‎ मंगळवार, २२ नोव्हेंबरला‎ महाप्रसादाच्या वितरणाने त्याची‎ सांगता करण्यात येईल.‎ मंदिरासमोर कार्यक्रमासाठी‎ आकर्षक मंडप उभारण्यात आला‎ असून, मोठ्या संख्येने भाविक‎ महोत्सवाचा लाभ घेत आहेत.‎

दैनंदिन कार्यक्रमांमध्ये‎ सकाळी ६ वाजता काकडा‎ आरती, १० वाजता भजन संगीत,‎ दुपारी ४ वाजता ज्ञानेश्वरीवरील‎ प्रवचन, सायंकाळी ६ वाजता‎ हरिपाठ व रात्री ८ वाजता‎ हरिकीर्तनाचा समावेश आहे.‎ पुण्यतिथी उत्सवातील अन्नदाते‎ केशवराव सावरकर स्व.‎ राजारामजी शिरभाते यांच्या‎ स्मृतिप्रीत्यर्थ, स्व. नंदलालजी‎ शर्मा, स्व. पद््माबाई जोशी,‎ बालाजी संस्थान वलगाव,‎ विठ्ठलराव भटकर, भाऊराव‎ पाटील यांच्या स्मरणार्थ व स्व.‎ रामकिसन पंचारिया यांच्या‎ स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवारी‎ अल्पोपहाराचे वितरण करण्यात‎ येईल. दुपारी ४ वाजता‎ महाप्रसादाला प्रारंभ होईल. संपूर्ण‎ कार्यक्रमासाठी श्री संत‎ गोवर्धनदास बाबा ट्रस्ट परिश्रम‎ घेत असून, भाविकांनी‎ कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे‎ आवाहन संस्थानच्या वतीने‎ करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...