आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीमधील घटना:कोरोना रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने अचानक घेतला पेट, चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली; रुग्णांचा जीव वाचवला

अमरावती2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तपासात समोर आले आहे की, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली होती

अमरावती जिल्ह्यात रुग्णाला घेऊन जात असलेल्या कोविड रुग्णवाहिकेला अचानक आग लागली. चालकाने सतर्कता दाखवत रुग्णवाहिका तत्काळ थांबवली आणि रुग्णाला बाहेर काढले. एवढेच नाही तर चालकाने इतर वाहन बोलावून रुग्णाला योग्य वेळी रुग्णालयातही पाठवले.

रुग्णवाहिका क्रमांक MH 40-AT 0427 आज सकाळी 11 वाजता अमोल ताटे नावाच्या एका रुग्णाला घेऊन लेहगांव येथून अमरावतीला जात होती. अमरावतीच्या पंचवटी चौकावर येताना ड्रायव्हर विक्कीला काही तरी जळत असल्याचा वास आला. त्याने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवताच गाडीच्या समोरच्या भागाला आग लागल्याचे दिसले. यानंतर विक्कीने स्वतःच्या जीवाची काळजी न करताच अमोलला बाहेर काढले.

शॉर्ट सर्किटमुळे लागली आग
तपासात समोर आले आहे की, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली होती. या आगीत रुग्णवाहिकेचा पुढचा भाग जळून खाक झाला. आग लागल्यानंतर ट्रॅफिक पोलिसांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी आग बुझवण्यात फायर ब्रिगेटडी मदत केली.

बातम्या आणखी आहेत...