आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावृक्ष संवर्धनाचे कार्य करणाऱ्या औदुंबर वृक्ष संवर्धन समितीच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार या समितीला प्रदान करण्यात आला. वृक्ष लागवड व संवर्धनाचे कार्य उमरखेड येथील औदुंबर वृक्ष संवर्धन समिती करीत आहे. याची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन २०१८-१९ चा सेवाभावी संस्था या गटातून विभागीय स्तरावरील छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार (द्वितीय) जाहीर झाला होता. त्याचे वितरण ८ मार्च रोजी यवतमाळ येथील वन भवन येथे वनसंरक्षक वसंत घुले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व ३० हजार रूपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र औदुंबर वृक्ष संवर्धन समितीला देऊन गौरवण्यात आले. उपवनसंरक्षक धनंजय वायभासे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी सामाजिक वनीकरण विभागाचे सर्व अधिकारी औदुंबर समितीचे सर्व सदस्य व कर्मचारी तसेच विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. मागील सात वर्षापासून औदुंबर वृक्ष संवर्धन समिती वृक्ष संवर्धनाचे अविरत कार्य करत असून समितीने दात्यांच्या सहकार्यातून ६५०० झाडे लावून वाढवली आहेत. त्याचीच फलश्रुती म्हणून समितीची शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात येऊन समितीला गौरविण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.