आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवाना:दोन दिवसांचा दौरा आटोपून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईला रवाना

अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारी (दि. २०) सायंकाळी शहरात आले होते. बुधवारी त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्या. तसेच गुरुवारी संपूर्ण दिवस त्यांनी राखीव ठेवला होता. दरम्यान गुरुवारी (दि. २२) सायंकाळी सात वाजता अमरावती- मुंबई एक्स्प्रेसने ते मुंबईकडे रवाना झाले.

गुरुवारी सकाळी राज यांनी मार्डी मार्गावरील विजय राऊत यांच्या अॅनिमेशन कॉलेजमध्ये भेट दिली. यावेळी त्यांनी कॉलेजमधील कलाकृती तसेच पेंटींग पाहिल्या तसेच उपस्थितांसोबत चर्चा केली. विजय राऊत आणि राज ठाकरे मैत्रीचे जुने संबंध आहेत. त्यानंतर ते शासकीय विश्राम गृहावर आले. मात्र त्यांनी कोणासोबतही संवाद साधला नाही. नियोजित दौऱ्यातच गुरूवार त्यांनी राखीव ठेवला होता. गुरुवारी सकाळपासून त्यांना पायाचा त्रास होत होता. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ते अमरावती मॉडर्न रेल्वे स्थानकावर पोहाेचले. वाहनातून रेल्वेच्या डब्यात जाईपर्यंत काही दूर अंतर पायी चालताना त्यांना त्रास होत असल्याचे जाणवत होते

बातम्या आणखी आहेत...