आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल बोंडेचा इशारा:मंत्री नवाब मलिकांविरोधात उच्च न्यायालयात अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार

प्रतिनिधी | अमरावती17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या विरोधात कथित व्हिडिओ क्लिप व्हायरल केल्याने अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार, असा इशारा माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी येथे अमरावती येथे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.

तसेच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे सज्जन गृहस्थ आहेत. मात्र, त्यांचे हातपाय बांधलेले आहेत. त्यामुळेच त्यांचे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण नाही. त्याचाच परिणाम म्हणजे अमरावती येथील हिंसाचार व दंगल असल्याचा आरोपही अनिल बोंडे यांनी केला.

नबाब मलिक यांनी मी खोटे बोलत असल्याचे म्हटले होते. मात्र मी खोटे बोलत नाही तर पुर्ण शुद्धीत बोलतो. ज्या-ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे, तेथे दंगली झाल्या नाहीत. याला कारण भाजपची कायदा व सुव्यवस्थेवर पूर्ण पकड असते, असेही बोंडे म्हणाले.

मला मलिक यांच्यासारखी वायफळ बडबड करण्याची सवय नाही. तथाकथित धर्मनिरपेक्षपणाचा आव आणणारेच दंगली घडवितात. अमरावती, मालेगाव, नांदेड वगळता इतर ठिकाणी दंगली का झाल्या नाहीत? यावर भाष्य करताना ही केवळ चाचणी होती असा आरोपही बोंडे यांनी केला.

बोडेंचा पवारांना टोला

पवार साहेबांनी प्रकृती जपावी, राष्ट्रवादीला विदर्भातील हवामान सहन होत नाही. विदर्भात महाविकास आघाडी सरकारबद्दल असंतोष आहे. शरद पवार यांनी विदर्भातील काही शहरांचा दौरा रद्द केला त्याला येथील जनतेचा असंतोष हेच कारण असून एक डाॅक्टर म्हणून मी पवार साहेबांना असा सल्ला देतो की, त्यांनी आधी प्रकृती जपावी, राष्ट्रवादीला विदर्भातील हवामान सहन होत नाही, असो टोलाही डाॅ. बोंडे यांनी लगावला.

अमरावतीतील शुक्रवारी इंटरनेट सेवा होणार सुरळीत

शहरातील इंटरनेट सेवा उद्या दुपारी (19 नोव्हेंबर) 3 वाजता पूर्ववत होणार आहे. अशी माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे. संचारबंदीत शिथिलते नंतर शहरातील स्थिती हळूहळू येतेय पूर्वपदावर शुक्रवारी सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 3 ते सांयकाळी 6 पर्यंत संचारबंदीत शिथीलता सोमवारपासून ठराविक वेळेत बाजारपेठ सुरू होणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी गुरुवारी दिली.

इनपूट- प्रमोद गावंडे

बातम्या आणखी आहेत...