आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या विधानाचा महाराष्ट्र नाभिक महामंडळाकडून निषेध

अमरावती7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाचा अपमानास्पद उल्लेख केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नाभिक महामंडळ अमरावती जिल्हा संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बीजवल यांना निवेदन देण्यात आले.महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, त्यांच्या याच विधानामुळे आता नाभिक समाजाने आक्रमक भूमिका घेतली असून, रस्त्यावर उतरून निषेध नोंदविण्यात येत आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील तिन्हीही पक्षांची अवस्था तिरुपतीमधील न्हाव्यांसारखी आहे, ‘अशी टीका दानवे यांनी केली होती. दानवे यांच्या याच विधानाचा निषेध महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे दानवे यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.यावेळी विवेक राऊत, निलेश जावरकर, विजय राव, सतीश देवघरे, सचिन उगोकार, राजेश लवनकर, स्वप्नील निंभोरकर, विजयानंद कुंभेकर, अंकुश मानकर, जय जोटांगीया, केवल ढेंगेकर, गौरव पेठेकर, अक्षय मर्दाने, सागर धामणकर, श्याम वायकर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...