आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादाजीसाहेब पटवर्धन हे स्वातंत्र्यसेनानी होते. त्यामुळे ते काही काळ कारागृहात होते. कारागृहात असताना अनेक कैदी कुष्ठरोगाने ग्रस्त असल्याचे त्यांनी पाहिले होते. तसेच ते बाहेर आल्यानंतर महात्मा गांधी यांच्या संपर्कात आले. दरम्यान, महात्मा गांधी यांनी सेवाग्राम आश्रमात एका कुष्ठरुग्णाची सेवा केली. मात्र, कुष्ठ रुग्णांच्या सेवेचे कार्य माझ्या हातून अर्धवट राहिले असून, ते आपण पूर्ण करावे, अशी इच्छा गांधीजींनी दाजीसाहेब पटवर्धन यांच्याकडे व्यक्त केली.
त्यानंतर दाजीसाहेबांनी अमरावतीत तपोवनाची स्थापना करुन कुष्ठरुग्णांसाठी रुग्णालय, निवासाची व्यवस्था केली. १९५० पासून सुरू झालेल्या तपोवनात आजही २८२ महिला, पुरूष कुष्ठरुग्ण वास्तव्याला आहेत. दाजीसाहेब स्वत: डॉक्टर होते. त्यांनी कुष्ठरुग्णांची व्यथा डोळ्यांनी पाहिली तसेच महात्मा गांधीजींनीसुद्धा त्यांना आपण हे कार्य करावे, यासाठी प्रेरणा दिली होती.
तसेच पूर्वीच्या काळात कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीला त्याचेच कुटुंबीय घराबाहेर काढून देत होते. सुरूवातीच्या काळात कुष्ठरोगावर प्रभारी औषधोपचार नव्हते. त्यामुळे अपगंत्व येत होते. तसेच हा आजार एकापासून दुसऱ्यांना होईल, अशी भीती नागरिकांच्या मनात होती म्हणून घरचा माणूसही कुष्ठरुग्णाला घरात घेत नव्हता. आता मात्र, प्रभावी औषधोपचार आला असून, कुष्ठरुग्णाला आता अपंगत्व येत नाही तसेच कुष्ठरोग पूर्णत: बरा होतो.
मात्र, सुरूवातीच्या काळातील परिस्थिती लक्षात घेऊन दाजीसाहेब उपाख्य डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी १९४६ मध्येच विदर्भ सेवारोगी मंडळ, तपोवनाचे काम सुरू केले. १९५० पासून या ठिकाणी कुष्ठरुग्णांवर निदान, उपचार तसेच त्यांच्या जेवण, राहण्याची आणि रोजगाराची व्यवस्था सुरू आहे. सुमारे २०० एकर जागेत तपोवनाचा विस्तार आहे. याठिकाणी महिला आणि पुरूषांसाठी उपचारासाठी तसेच उपचारानंतर ते बरे झाल की, राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
याच ठिकाणी आजारातून बरे झाल्यानंतर त्यांना रोजगाराचीसुद्धा व्यवस्था आहे. लोखंडी, लाकडापासून वस्तू तयार करणे, सतरंजी तयार करणे, खुर्ची बनवणे, प्रिटींग प्रेस असे व्यवसाय याठिकाणी आजही सुरू आहेत, अशी माहिती विदर्भ सेवारोगी मंडळ, तपोवनचे अध्यक्ष डॉ. अतुल आळशी यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
डॉ. पांडुरंग आळशी यांच्या मदतीने शस्त्रक्रिया केल्या दाजीसाहेबांनी तपोवन सुरू केले, ते डॉक्टर होते. मात्र ते सर्जन नसल्यामुळे त्यांना कुष्ठरुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्जन असलेल्या डॉक्टरांची मदत आवश्यक होती. त्यावेळी अमरावतीतील पहिले सर्जन डॉ. पांडुरंग आळशी व अन्य दोन ते तीन डॉक्टरांनी दाजीसाहेबांसोबत काम केले. डॉ. पांडुरंग आळशी यांनी तपोवनमध्ये जाऊन कुष्ठरुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या.
तसेच ज्येष्ठ समाजसेवी बाबा आमटे हे सुद्धा तपोवनमध्ये एक महिना राहिले, त्यांनी कुष्ठरुग्णांची सेवा केली, नंतर त्यांनी आनंदवनाची स्थापना केल्याचेही डॉ. अतुल आळशी यांनी सांगितले. डॉ. पांडुरंग आळशी यांच्या मदतीने शस्त्रक्रिया केल्या दाजीसाहेबांनी तपोवन सुरू केले, ते डॉक्टर होते. मात्र ते सर्जन नसल्यामुळे त्यांना कुष्ठरुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्जन असलेल्या डॉक्टरांची मदत आवश्यक होती.
त्यावेळी अमरावतीतील पहिले सर्जन डॉ. पांडुरंग आळशी व अन्य दोन ते तीन डॉक्टरांनी दाजीसाहेबांसोबत काम केले. डॉ. पांडुरंग आळशी यांनी तपोवनमध्ये जाऊन कुष्ठरुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. तसेच ज्येष्ठ समाजसेवी बाबा आमटे हे सुद्धा तपोवनमध्ये एक महिना राहिले, त्यांनी कुष्ठरुग्णांची सेवा केली, नंतर त्यांनी आनंदवनाची स्थापना केल्याचेही डॉ. अतुल आळशी यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.