आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज चोऱ्या:‘महावितरण’च्या पथकांनी शहरात पकडल्या 35 लाखांच्या वीज चोऱ्या

अमरावती4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणच्या भरारी पथकाच्या माध्यमातून शहरात वीज चोरी विरोधात एकाच वेळी धाडसत्र राबवण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या धाड सत्रात शहरातील ८२ ग्राहकांकडून ३५ लाख २३ हजार रुपयांच्या वीज चोऱ्या उघड करण्यात आल्या आहेत. तडजोडीच्या रकमेसह वीज चोरीची रक्कम न भरणाऱ्या वीज चोरांवर फौजदारी दाखल करण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे.

अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्या पुढाकारने विदर्भातील ११ जिल्ह्यातील १२ भरारी पथकाला पाचारण करून एकाच वेळी धाडसत्र राबवण्यात आले. आगामी काळातही वारंवार वीजचोरी विरोधात मोहीम अधिक तीव्र करण्याचे नियोजन केल्याची माहिती कार्यकारी अभियंता आनंद काटकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...