आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पासष्ट किलो गांजा प्रकरण:गांजा तस्करी करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला हैदराबादेत अटक, कळंब पोलिसांची कारवाई; आरोपीला तीन दिवसांची कोठडी

कळंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील पाथ्रड शिवारात कात्री (रुईकर) गावासमोरील पुलाखाली गांजा भरुन असलेली भरधाव स्विफ्ट डिझायर कार पुलाखाली उतरुन पट्टी झाल्याने कारचा चालक गंभीर जखमी झाला. ही घटना दि. १९ मे रोजी उघडकीस आली असून त्यावेळी अब्दुल सुखीयान अब्दुल वकील वय २५ वर्ष रा. सुफीया नगर अमरावती याला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आता यातील मुख्य सुत्रधार पिंटू उर्फ क्रिष्णा राज महेंद्र पु वय ३१ वर्ष रा. हैद्राबाद याला दि. ३१ ऑगस्टला कळंब पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली.

या प्रकरणी प्राप्त माहितीनूसार, हैद्राबाद (तेलंगणा) येथून अमरावती जिल्ह्यात गांजाची मोठी तस्करी नेहमी राळेगाव, कळंब मार्गे हायवे रोडने सुरु आहे. या मार्गाने नेहमी गांजाची तस्करी करीत असावा त्यामुळेच दि. १९ मे रोजी मध्यरात्री कळंब तालुक्यातील पाथ्रड शिवारात कात्री गावाजवळ पुलाखाली कार पट्टी झाल्याने त्याचे पितळ उघडे पडले. अपघात होऊन गांजा भरुन असलेली कार पलटी झाली व याच गांजाची तस्करी करणारा चालक गंभीर जखमी झाल्याने रात्रभर त्याच ठिकाणी पडून राहिला. ही बाब दुसऱ्या दिवशी सकाळी पुलाशेजारील शेतकरी व गुराखी शेतात गेले असता, त्यांच्या लक्षात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी २ वाजतापासून कारचा पंचनामा व्हिडिओ शुटींगमध्ये सुरु केला. यावेळी कारच्या डीक्कीमधुन तीन प्लास्टिकच्या थैली मधुन २६ पाकीट बाहेर काढून गांजाचा वजनकाटा करण्यात असता, ६४ किलो ३४६ ग्रॅम गांजा आढळला होता. जखमी असलेला चालक अब्दुल सुखीयान अब्दुल वकील याला तीन महिन्याच्या उपचारानंतर कारागृहात रवानगी करण्यात आली होती. तर यातील गांजा पुरवणारा मुख्य सुत्रधार पिंटू उर्फ क्रिष्णा राज महेंद्र पु दि. ३१ ऑगस्टला हैद्राबाद येथून अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अभय चौथनकर करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...