आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील काही महिला हॉकी खेळाडूंनी स्थापन केलेल्या ‘वुमेन्स हॉकी अकादमी’तर्फे आगामी १७ ते १९ जून दरम्यान ‘मेजर ध्यानचंद कप ऑल इंडिया वुमेन्स हॉकी टूर्नामेंट’चे आयोजन करण्यात आले आहे. हॉकीच्या क्षेत्रात त्यातही महिलांच्या बाबतीत बहुदा पहिल्यांदाच असा मेगा स्पोर्ट इव्हेंट अमरावतीत होतो आहे.
या टूर्नामेंटची तयारी सुरु झाली असून जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी अलीकडेच या टूर्नामेंटच्या उद्घाटनाचे निमंत्रण स्वीकार केले. यानंतर त्यांच्या साक्षीने पुढील अनेक बाबी पूर्णत्वास जाणार आहेत. हा तीन दिवसीय हॉकी उत्सव ‘लीग कम नॉकआउट’ च्या धर्तीवर खेळला जाणार असून त्यासाठी जिल्हा स्टेडियम, इतवारा भागातील डिप्टी ग्राऊंड व पोलिस कवायत मैदान यासह इतर दोन अशा पाच मैदानांची तयारी केली जात आहे.
सदर टूर्नामेंटसाठी भारतीय हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचे सुपुत्र तथा भारतीय हॉकी चमूला ऑलिम्पिकमध्ये बरेचदा सुवर्णपदक प्राप्त करुन देणारे अशोक ध्यानचंद, इंदोर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल वर्मा, हॉकी खेळातील अजोड कारकीर्दीमुळे ज्यांच्या जीवनावर बॉलीवूड किंग शाहरुख खानने ‘चक दे इंडिया’ सिनेमा बनविला, त्या मीर रंजन नेगी, भारतीय हॉकी टीमचे माजी गोलकीपर अशोक दिवाण, भारतीय महिला हॉकी चमूच्या माजी कॅप्टन सबा अंजुम, आघाडीची खेळाडू नेहासिंग, अर्जुन पुरस्कारप्राप्त प्रितम सिवाच, असलम शेरखान, विजय फिलिप्स, ओंकारसिंग, गोविंदा, सय्यद जलाल, सुदर्शनसिंग, हेमन्त दुबे (बैतुल), समालोचक आफाक अहमद (झांसी), समीर दाद (भोपाल) यांच्यासह देशभरातील अनेक नामवंत खेळाडू अमरावतीत येणार आहेत.
या टुर्नामेंटसाठी देशभरातील १६ चमूंची निवड केली जाणार आहे. अमरावतीत पहिल्यांदाच होत असलेल्या या मेगा स्पोर्ट इव्हेंटसाठी स्वत: क्रीडा उपसंचालक विजय संतान यांनी पुढाकार घेतला असून नियोजन बैठक त्यांच्याच निवासस्थानी पार पडली. यावेळी आयोजन समितीचे समन्वयक इरफान अतहर अली व माजी हॉकी खेळाडू नम्रता पावडे, अमरावती विभागीय पत्रकार अधिस्वीकृती समितीचे माजी अध्यक्ष नानक आहूजा, पोलिस उपायुक्त विक्रम साळी, वरिष्ठ ठाणेदार राहुल आठवले, मनपा उपयुक्त नरेंद्र वानखडे, जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी, शेख इमाम साहेब, सलीमभाई मिरावाले, डॉ. कुशल झंवर, सुभाष पावड़े, सुनील खराटे, दीपक धुरन्धर, एड. अपर्णा ठाकरे, सुरेखा दुबे, इमरान शेख, डॉ. समीर शाह, डॉ. हसीना शाह, अॅड. मनीष सिरसाठ, अमोल पाटील, प्रशांत मोंढे, अभिषेक डागा आदी मान्यवर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.