आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्ववत उपलब्ध:शेतकऱ्यांना देण्यात येणारे गव्हाचे नियतन पूर्ववत उपलब्ध करून द्या

उमरखेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या गव्हाचे नियमन पूर्ववत करून उपलब्ध करून देण्यात यावे, या मागणीसाठी ‘मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेल्फेअर’ संघटनेच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले.

महाराष्ट्रात अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या १४ जिल्ह्यातील साधारण १० लाख शेतकरी (केशरी) कार्डधारक यांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून दिले जाते. भारतीय अन्न महामंडळाच्या ३१ मे २०२२ च्या पत्राने या योजनेतील गहू बंद करण्यात येणार असल्याचे दिसून येते. तसेच दि. १९ मे २०२२ च्या पत्राने केवळ तांदुळाचे नियतन उचल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु प्रत्यक्ष गव्हाचे वाटप पूर्णपणे बंद करून काही ठिकाणी केवळ माणसी एक किलो तांदूळ दिला जातो.

या १४ जिल्ह्यातील शेतकरी निसर्गाच्या वक्र दृष्टीने सतत हवालदिल, अडचणीत असल्याने यांना सदरची सवलत देण्यात आलेली आहे. या सर्व पात्र लाभार्थींना सवलतीच्या दरातील अन्न धान्याची नितांत गरज असल्याची मागणी त्यांनी आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी तसेच प्रशासनाला केलेली आहे. मुख्यमंत्री यांनी प्रकरणात लक्ष देऊन १४ जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना मिळणारे गव्हाचे नियतन पूर्ववत सुरू करावे, कमी करण्यात किंवा कमी वाटप करण्यात येत असलेल्या तांदळाबाबत चौकशी करून तातडीने कार्यवाही करावी, जन हितार्थ या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन शेतकरी कुटुंबांना दिलासा देऊन सहकार्य करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...