आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन‎:‘शहरातील मालमत्ता कराची माहिती सार्वजनिक करा’‎

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा क्षेत्रात मागील एक‎ वर्षापासून शहरातील मालमत्तेचे मोजमाप‎ (असिस्मेंट) एका खासगी कंपनीकडून‎ होत आहे. ही खासगी कंपनी प्रतिनिधी‎ मालमत्ता धारकांकडून अतिरिक्त पैसे घेत‎ आहे. त्यामुळे मालमत्ता कराची मोजमाप‎ माहिती सार्वजनिक करावी, तसेच बंद‎ असलेली सिटी बस सेवा सुरळीत‎ करावी, यासह अन्य मागण्यांसाठी‎ अमरावती नागरी कृती समितीच्या वतीने‎ पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन‎ देण्यात आले.‎ निवेदनात म्हटले की, मनपाच्या वतीने‎ मालमत्ता कर आकारण्यात येत आहे.‎ यामध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर‎ वसुली करण्यात येत आहे. यामध्ये‎ निवास मालमत्तेचे ७० पैशापेक्षा ९९ पैसे,‎ व्यावसायिक मालमत्ता कर २.१० पैसे‎ ऐवजी ३.८२ पैसे तसेच भाडेकरी कर हा‎ ५७ टक्के मालमत्ता कर वाढवण्यात‎ आल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे. या‎ सर्व करांचा खुलासा मनपाने सार्वजनिक‎ केला नाही. त्यामुळे मालमत्ता धारकांना‎ कराची माहिती सार्वजनिक करावी.‎