आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:दीक्षाभूमीवर जाणाऱ्या‎ अनुयायांसाठी टोल फ्री करा‎; भीम ब्रिगेड संघटनेचीजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त‎ दीक्षाभूमीला येणाऱ्या,‎ जाणाऱ्यांसाठी त्यांच्या वाहनांना‎ टोल टॅक्स आकारण्यात येऊ नये,‎ वाहतूक टोल टॅक्स फ्री करण्यात‎ यावी, या मागणीसाठी भीम ब्रिगेड‎ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना‎ निवेदन दिले.‎ १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो‎ अनुयायांसमवेत दीक्षाभूमी नागपूर‎ येथे दीक्षा घेतली.

त्यामुळे दरवर्षी‎ धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो‎ भीम अनुयायी यांच्यासह विविध‎ जाती धर्माचे नागरिक नागपूर येथे‎ अभिवादनाकरिता येतात. यामध्ये‎ काही अनुयायी हे खाजगी वाहनांनी‎ येजा करतात. त्यामुळे येणाऱ्या‎ विजया दशमीच्या दिवशी टोल टॅक्स‎ फ्री करण्यात याव्यात या मागणीचे‎ निवेदन भीम ब्रिगेडच्या वतीने‎ जिल्हाधिकाऱ्यांमार्फ त केंद्रीय‎ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना‎ देण्यात आले.

यावेळी विक्रम तसरे,‎ प्रवीण मोहोड, अंकुश आठवले,‎ नितीन काळे, शरद वाकोडे, प्रवीण‎ वानखडे, रुपेश तायडे, मनोज चक्रे,‎ अविनाश जाधव, अजय तायडे,‎ गौतम सवई, सुशील चोरपगार,‎ रोशन गडलिंग, विजय मोहोड,‎ गौतम गवळी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...