आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीतील धक्कादायक घटना:बलात्कार पीडितेची गळफास घेत आत्महत्या, एका आरोपीला अटक; पीडिता 7 महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड

अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • साकीनाका बलात्कार प्रकरणातील महिलेचा मृत्यू

मुंबई पाठोपाठ आता अमरावती जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. एकीकडे, मुंबईतील साकीनाका प्रकरणातील पीडित महिलेचा मृत्यू झाल्याने सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. विरोधी पक्ष या प्रकरणावरुन आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील एका बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर येत आहे. या दोन्ही घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राज्यभरात तणवाचं वातावरण निर्माण झालं आहे. विरोधी पक्षांकडून संबंधित प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.

संपूर्ण प्रकरण काय आहे?
मुंबईतील घटना ताजी असताना अमरावती शहरातून धक्कादायक घटना समोर येत आहे. जिल्ह्यातील दर्यापूर येथील एका बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणात एका नराधमाने पीडित मुलीशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची समोर येत आहे. ही मुलगी आपल्या आई-वडिलासंह राहत होती. ती 17 वर्षाची असून एका तरुणानं तीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. शारीरिक संबंधामुळे ती 7 महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. परंतु, ही घटना आपल्या घरच्यांना माहित होणार या भीतीपोटी तीने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरणातील महिलेचा मृत्यू
साकीनाका येथील बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने शहरातील एका रुग्णालयात उपचारांदरम्यान प्राण सोडले आहे. पीडिता महिला 9 सप्टेंबरला साकीनाका परीसरातील खैरानी रोडवर बलात्कारानंतर बेशुद्धा अवस्थेत सापडली होती. या घटनेत पीडित महिलेसोबत निर्भयासारखे व्यवहार झाल्याचे समोर आले होते.

या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री तीन वाजता घडली होती. आरोपींनी सामूहिक बलात्कारानंतर महिलेच्या खासगी अवयवात रॉड घुसवला होता. यामुळे पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक होती. पोलिसांनी पीडित महिलेला खैरानी रस्त्यावरून उचलून आणले होते. पोलिसांनी आतापर्यंत सदरील प्रकरणात आरोपींना अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...