आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालिकेचा लैंगिक छळ:नऊ वर्षीय बालिकेचा लैंगिक छळ प्रकरणी नराधमाला 20 वर्षांची शिक्षा; नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीत दीड वर्षांपूर्वी घडली घटना

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अवघ्या नऊ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोषी नराधमाला न्यायालयाने २० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना दीड वर्षांपूर्वी घडली होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक २) विशाल गायके यांच्या न्यायालयाने बुधवारी (दि. ११) हा निर्णय दिला आहे.

विधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद महादेव मानकर (३६,) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. २५ नोव्हेंबर २०२० रोजी ही घटना घडली होती. पीडीत नऊ वर्षीय बालिका घटनेच्या दिवशी दुपारी तिच्या मैत्रिणीच्या घरी खेळायला गेली असता हा प्रकार घडला होता. त्यानुसार, आरोपीविरुद्ध नांदगाव पेठ पोलिसांनी बलात्कार तसेच पोक्सो व ॲट्रासिटी कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. शरद मानकरला त्याचदिवशी अटक करण्यात आली होती.

त्याच्याविरुद्ध ३१ डिसेंबर २०२० रोजी दोषारोपपत्र नांदगाव पेठ पोलिसांनी दाखल केले. याप्रकरणी सहायक सरकारी वकील दिलीप तिवारी यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यापैकी पंचनाम्यावरील पंच फितूर झाले. न्यायाधीश गायकी यांच्या न्यायालयात पीडितेची साक्ष, तिला संलग्नित असलेल्या वैद्यकीय तपासणी अहवालावर विश्वास दर्शवून आरोपी शरद यास पोस्कोच्या कलम ४ व ६ अन्वये दोषी ठरवले.

त्याला दोन्ही कलमान्वये २० वर्षे सक्तमजुरी ठोठावण्यात आली. दोन्ही शिक्षा त्याला एकत्रित भोगा वयाच्या आहेत. आरोपीने त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे देखील सिद्ध करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास नांदगाव पेठ ठाण्याच्या एपीआय कविता पाटील तसेच तत्कालीन एसीपी सोहले शेख यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून चैतन्य बंदीवान, संतोष चव्हाण व अरूण हटवार यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...