आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनुर्विद्या:राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठीमानव जाधव यांची निवड

दर्यापूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील तोंगलाबाद येथील रहिवासी मानव जाधव यांची सिनियर राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. उस्मानाबाद येथे पार पडलेल्या सिनियर राज्यस्तरीय स्पर्धेत मानव जाधव याने एक सुवर्ण व दोन रौप्य पदक प्राप्त केले. त्याची जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या सिनियर राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्र संघातील सर्वात लहान खेळाडू म्हणून १३ वर्षीय मानव सहभागी होणार आहे. त्याची निवड खुल्या गटामध्ये झाली असून त्याने ७२० पैकी ६९६ गुण मिळवले होते. तो बुलडाणा येथील शिवबा आर्चरी अकॅडमी मध्ये चंद्रकांत इलग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. मानव आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, प्रशिक्षक, महाराष्ट्र आर्चरी संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर, अध्यक्ष प्रशांत देशपांडे, सदानंद जाधव व मित्र परिवाराला देतो.

बातम्या आणखी आहेत...