आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभीष्टचिंतन सोहळा‎:श्री क्षेत्र रिद्धपूर येथे महानुभाव‎ पंथातील महंतांची मांदियाळी‎

परतवाडा‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री क्षेत्र रिद्धपूर येथील कवीश्वर कुलभूषण‎ आचार्य प्रवर महंत श्रीगोपीराजबाबा शास्त्री‎ यांचा ८१ वा अभीष्टचिंतन सोहळा व‎ संन्यास दीक्षार्थी धर्मकुमार भुषण चनोडे व‎ धर्मकुमारी रश्मी कपाटे यांचा संन्यास‎ अनुसरण विधीचा दोन दिवसीय कार्यक्रम‎ रिध्दपूर येथे आयोजित करण्यात आला‎ होता. या कार्यक्रमाला राज्यभरातील‎ प्रतिष्ठित महंत, संत, भिक्षुक, वासनिक‎ प्रामुख्याने उपस्थित झाले होते.‎ राजेश्वरी येथे आयोजित या‎ कार्यक्रमाच्या प्रारंभी गावातून मिरवणूक‎ काढण्यात आली. त्यानंतर अभीष्टचिंतन‎ सोहळा, तर रविवारी (दि. २०)‎ समारोपीय कार्यक्रम पार पडला.

या वेळी‎ धर्मपीठावर उपस्थित सर्व महंताचा‎ श्रीगोपीराज संस्थानच्या वतीने सत्कार‎ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक‎ प्रसन्नमुनी शास्त्री कवीश्वर यांनी केले.‎ या प्रसंगी श्री गोपीराज बाबा शास्त्री यांचा‎ सत्कार आयोजित करण्यात आला. या‎ कार्यक्रमात विविध ग्रंथाचे व बाबांच्या‎ कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा विशेषांक‎ व स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.‎ या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...