आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्कामोर्तब:मनुष्यबळ कंत्राट ; 93 पैकी 9 पात्र स्पर्धक कंपन्या शर्यतीत, फायनान्शियल बीड खुले झाल्यावर कंपनीची निवड

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाद्वारे मनुष्यबळ नियुक्ती कंत्राटासाठी देशभरातून निविदा मागवण्यात आल्या. यासाठी ९३ कंपन्या शर्यतीत होत्या. छाणनीनंतर ९ स्पर्धक पात्र ठरले आहेत. यांची तांत्रिक तपासणी झाली असून फायनान्शियल बीड खुले झाल्यानंतरच कंत्राट मिळवणाऱ्या कंपनीच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. ८ दिवसात ही कारवाई पूर्ण होईल, अशी माहिती आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली.

मनपाद्वारे सध्या एका वर्षासाठी मनुष्यबळ नियुक्ती कंत्राट दिले जात होते. परंतु, यंदा तीन वर्षांसाठी दिले जाणार आहे. सुमारे २७ कोटी रु.च्या या कंत्राटासाठी कंपन्यांच्या उड्या पडल्या. मनपात दर महिन्यात नियमित कर्मचारी निवृत्त होत असले तरी शासनाकडून नवीन कर्मचारी भरतीस परवानगी नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून काम करून घ्यावे लागते.

अनेक वर्षांपासून मनपात कंत्राटी तत्त्वावर मनुष्यबळ कार्यरत असून, त्यांना बऱ्यापैकी अनुभवही मिळाला आहे. जी कंपनी मनुष्यबळ कंत्राट मिळवेल त्यांना या कर्मचाऱ्यांनाही सामावून घ्यावे लागेल, अशी मनपाची अट आहे. आवश्यकतेनुसार ज्या नवीन नियुक्ती कराव्या लागतील त्यांची नियुक्ती कंत्राट मिळवणाऱ्या कंपनीमार्फत होईल. यात २९ शारीरिक शिक्षकांचाही समावेश असेल.

बातम्या आणखी आहेत...