आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तलावांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने मॅपिंग करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; आपत्ती व्यवस्थापनविषयक स्थितीचा घेतला आढावा

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यात अनेकदा तलाव फुटून दुर्घटना घडतात. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी आपल्या अखत्यारातील तलावांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी करून आवश्यक उपाययोजना अंमलात आणाव्यात, तसेच तलाव सुरक्षिततेच्या जबाबदारीत सुस्पष्टता येण्यासाठी सर्व तलावांचे तत्काळ मॅपिंग करून तलाव कोणत्या विभागाचा आहे, याची माहिती सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले.

बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सिंचन, आरोग्य यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

शिवकालीन तलाव, जुने तलाव, जलस्रोतांची सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी करून आवश्यक त्या दुरुस्ती कराव्यात. नाला खोलीकरणाची कामे पूर्ण करावी. आगामी पावसाळा लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन कक्ष, तसेच प्रत्येक तहसील यंत्रणेने पूर्वतयारी करावी. शोध पथकांकडील बोट व इतर साहित्याची तपासणी करून घ्यावी व गरज असल्यास दुरुस्ती करून घ्यावी. प्रकल्पांच्या ठिकाणी आपत्ती व व्यवस्थापन पथकांकडून मॉक ड्रिल करून घ्यावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...