आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माकडाचा हल्ला:अकोट शहरामध्ये चवताळलेल्या माकडाचा हैदोस; नागरिक भयभीत

अकोट7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट शहरात चवताळलेल्या माकडाने एका मुलास चावा घेतला. - Divya Marathi
अकोट शहरात चवताळलेल्या माकडाने एका मुलास चावा घेतला.

अकोट शहरातील काही भागात एका चवताळलेल्या माकडाने अक्षरशः हैदोस घातला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हे माकड लहान बालकांवर हल्ले करत असून परिसरात भीतीचे वातावरण आहे. या प्रभागाचे नगर सेवक विवेक बोचे यांनी उपवन संरक्षक यांना लेखी तक्रार नोंदवून माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

अकोट शहरातील यात्रा चौक, लेंडीपुरा, दूरदर्शन केंद्र या परिसरात एका चवताळलेल्या माकडाने गेल्या काही दिवसांपासून चार ते पाच मुलांना चावा घेऊन जखमी केले आहे. २५ नोव्हेंबर सकाळच्या सुमारास दूरदर्शन केंद्राजवळ काही मुले खेळत असताना माकडाने अचानक हल्ला चढवला. यामध्ये एका लहान मुलीला चावा घेतला असून. गंभीर दुखापत झालेल्या दोन मुलांना पुढील उपचारासाठी अकोला येथे दाखल करण्यात आले.

हे माकड विशेषतः लहान मुलांच्या अंगावर थेट धावून जात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसभर परिसरात संचार करणाऱ्या या माकडामुळे मोठ्या प्रमाणात कौलारू व सिमेंट पत्रे असणाऱ्या घरांचे नुकसान होत आहे. माकडाचा हल्ल्यामुळे जीवितास धोका निर्माण झाला असून, या माकडांचा वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नगरसेवक विवेक बोचे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...