आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:मंदिरात लग्न; तरुणीवर अत्याचार मात्र,  अपत्याचा स्वीकार करण्यास दिला नकार

अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २३ वर्षीय युवकाने दोन वर्षांपूर्वी एका तरुणासोबत मंदिरात प्रेमविवाह केला. त्यानंतर तरुणीवर वारंवार अत्याचार केला. नंतर कायदेशीर लग्न करु असे सांगून तीला माहेरी पाठवले. दरम्यान तरुणीने एका बाळाला जन्म दिला. आता मात्र ते बाळ व तरुणीला स्वीकारण्यासाठी तरुण साफ नकार देत आहे. त्यामुळे पीडितेने गाडगेनगर पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी बुधवारी (दि. २१) उशिरा रात्री सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तरुणाने २०२० मध्ये तरुणीसोबत नागपुरातील एका शिवमंदिरात लग्न केले. लग्नानंतर हे दोघेही सोबत राहू लागले. काही दिवस तरुणाच्या घरच्यांनीसुद्धा तिला सून भासवून घरात ठेवले. त्यावेळी सुमारे एक महिना या तरुणीवर तरुणाने वारंवार अत्याचार केला. नंतर तरुणाने तरुणीला म्हटले की, आपण लवकरच कायदेशीर लग्न करु, मात्र तोपर्यंत तू माहेरी थांब. म्हणून ती तरुणी माहेरी आली.

त्यानंतर काही दिवसांनी अमरावती व बडोदा या ठिकाणी नेऊन तरुणाने तरुणीचे पुन्हा लैंगिक शोषण केले. याचदरम्यान तरुणीला गर्भधारणा झाली व काही महिन्यांपूर्वी तरुणीने एका बाळाला जन्म दिला. आता मात्र, या बाळाचा स्वीकार करण्यासाठी तरुण व त्याचे नातेवाइक तयार नाहीत. इतकेच नाहीतर तरुण, त्याचे नातेवाइक तसेच उपसरपंच रोशन रमेश बहीरमकर यांनी धमकी दिली कि, पैसे घेऊन शांत बस नाहीतर गायब करेल. या प्रकारामुळे पीडितेने गाडगेनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी पीडितेवर मागील दोन वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या तिच्या पतीसह पतीचे चार नातेवाईक व उपसरपंच रोशन अहिरेकर यांच्याविरुद्ध बलात्कार, विश्वासघात, धमकी देणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...