आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास घेवून आत्महत्या:नालवाडा येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

दर्यापूर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील खल्लार पोलिस स्टेशन अर्तंगत येणाऱ्या नालवाडा येथील रेणुका नरेंद्र गावंडे (२५) नामक विवाहितेने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. ५) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेच्या वेळी घरी कुणीही नव्हते. घटनेची प्राथमिक माहिती गावचे पोलिस पाटील आशिष गावंडे यांनी खल्लार पोलिस स्टेशनला दिली.

दुय्यम ठाणेदार अनुराधा पाटिखेडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. दरम्यान रेणुका हिने आत्महत्या केली नसून घातापत झाल्याचा आरोप मृतक विवाहितेच्या कुटुंबियांनी केला आहे. सायंकाळी उशीरा खल्लार पोलिसात मृतक विवाहेतेचे काका राम देविदास ताथोड यांनी तक्रार नाेंदवली. उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. या वेळी प्रभारी ठाणेदार संघरक्षक भगत यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देवून शवविच्छेदन अवहालानंतर संबंधितावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे उपस्थित नातेवाइकांना सांगीतले.

बातम्या आणखी आहेत...