आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण आग:अमरावती एमआयडीसीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सदर कंपनीचे फायर ऑडिट झाले नसल्याचे माहिती समोर येत आहे.

अमरावती शहरातील जुन्या बायपासलगतच्या एमआयडीसीत मोठी घटना घडली आहे. एमआयडीसीत शनिवारी मध्यरात्री 2 वाजता केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली. दरम्यान, या आगीत कंपनीतील सामानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही आग इतकी मोठी होती की, या आगीचा धूर 2 किलोमीटर अंतरावरुन दिसून येत होता. आकाशात सर्वत्र काळा धूर पसरला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करताना अग्निशमन दलाचे अधिकारी
आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करताना अग्निशमन दलाचे अधिकारी

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आग आटोक्यात आण्यण्यासाठी प्रयत्न सुरुच होते. काही तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमरावती शहरासहीत बडनेरा, चांदुर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, धामणगाव येथील अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

आगीत कंपनीतील साहित्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
आगीत कंपनीतील साहित्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरीला शनिवारी मध्यरात्री 2 वाजता आग लागली. या आगीत कंपनीतील साहित्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परंतु, ही आग कशामुळे लागली याबाबत अद्याप अधिकृत असे काहीही सांगण्यात आले नाही. कंपनीतील ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सदर कंपनीचे फायर ऑडिट झाले नसल्याचे माहिती समोर येत आहे.

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून बचाव कार्य वेगाने सुरु होते.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून बचाव कार्य वेगाने सुरु होते.
बातम्या आणखी आहेत...