आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:धारणीच्या उप जिल्हा रुग्णालयात माता मृत्यू

धारणी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील उपजिल्हा रुग्णालय गेल्या काही वर्षांपासून या ना त्या कारणाने सतत चर्चेत आहे. शुक्रवारी झालेल्या एका माता मृत्यूनंतर मृत महिलेच्या नातेवाइकांनी रुग्णालयात घातलेला गोंधळ व रुग्णवाहिका चालकाला केलेल्या मारहाणीमुळे पुन्हा चर्चेत आले आहे. सबा शेख नदीम (२२) असे मृत्यू झालेल्या मातेचे नाव आहे.

माहेरी आलेल्या मृत मातेला प्रसव वेदना सुरू झाल्याने ती गुरुवारी (दि. १०) सकाळी साडेनऊच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. दुपारी तीने एका बाळा जन्म दिला. मात्र, शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी तिला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिची गंभीर अवस्था पाहता तेथील डॉक्टरांनी तिला अमरावती येथे हलवण्यासाठी नातेवाइकांना सांगीतले. मात्र, १०८ रुग्णवाहिकेत टाकताच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी तिच्या नातेवाइकांना रुग्णारय प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला आहे.

रुग्णवाहिका चालकाला मारहाण नाजूक अवस्थेत असलेल्या सबाला १०८ रुग्णवाहिकेतून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू होती. मात्र तिला ऑक्सिजन लावण्याकरिता ऑक्सिजन सिलिंडर बदलण्यात थोडा वेळ लागला, परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त नातेवाइकांनी रुग्णवाहिका चालकाला मारहाण केली.

परमोनली ॲम्बुलिझममुळे मृत्यू
सबाचा मृत्यू परमोनली ॲम्बुलिझममुळे झाला असून, रुग्णवाहिकेचे ऑक्सिजन सिलिंडर संपले असता तो चालकाकडून बदलण्यात आले होते, तरी नातेवाइकांकडून रुग्णवाहिका चालकास मारहाण केली, याची माहिती पोलिसांना दिली. -डॉ. मंगेश मेंढे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, धारणी

बातम्या आणखी आहेत...