आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:युक्रेनमधून परतलेल्या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांचे घरातून ऑनलाइन शिक्षण सुरू

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मागवली विद्यार्थ्यांची माहिती; मात्र अजून निर्णय नाही

कोरोना काळात सुमारे दीड वर्षे सर्वच विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण घेतले. मात्र, अलीकडे कोरोनाचे सावट कमी झाले असून, ऑफलाइन शिक्षण सुरू झाले आहे. याच काळात युक्रेन-रशिया युद्धामुळे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी मायदेशी परतले. अमरावती शहर व जिल्ह्यातील १७ विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे देणे सुरू केले आहे. युद्धजन्य परिस्थितीतही युक्रेनमधून नियमितपणे ऑनलाइन वर्ग होत असल्याचे काही विद्यार्थ्यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

युद्धजन्य परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडून हजारो विद्यार्थी युक्रेनमधून भारतात परतले आहेत. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नसल्याचे केंद्र व राज्य सरकारने सांगितले. त्यामुळे देशात व राज्यातही त्या संदर्भात आगामी काळात निर्णय होऊ शकतो. सद्य:स्थितीत या विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. मात्र, हा निर्णय घेण्यापूर्वी युक्रेनमधून राज्यात परतलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची माहिती नाशिकच्या आरोग्य विज्ञान विज्ञापीठाने गोळा करण्याचे काम सुरू केले आहे.

शिक्षण वेळेत पूर्ण व्हावे, हीच अपेक्षा
प्रवेश घेतला तेव्हा विशिष्ट वेळेत शिक्षण पूर्ण होऊन पदवी बहाल केली जाईल, असे ठरले होते. परंतु मध्येच युद्धाचा प्रसंग उद्भवला. माझे ऑनलाइन वर्ग सुरु आहेत. त्यातून शिकवले तर जाते. परंतु परीक्षा वेळेत न झाल्यास पदवी अडचणीत येणार आहे. तसे होऊ नये, यासाठी सरकारने मदत करावी. त्यासाठीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे पाठवले आहे.
-ऋषभ गजभिये, अमरावती.

शासकीय पातळीवर प्रयत्न सुरुच
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासकीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. युक्रेनहू परतलेल्या विद्यार्थ्यांना उर्वरित शिक्षण भारतात पूर्ण करुन पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवून द्यावी, अशी पालक असोसिएशनची मागणी आहे. अद्याप त्याबाबत काही उत्तर आले नाही.
-आशिष बिजवल, निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...