आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात दरवर्षी कोट्यवधींचा महसूल जमा होतो. यावर्षी जिल्ह्याला ३५ कोटी ९० लाखांचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले होते. ३१ मार्चपर्यंत वर्षभरातील शंभर टक्के म्हणजे ३६ कोटी ९६ लाख रूपये महसूल विभागाने जमा केले आहे. मार्च एंडिंगपर्यंत शंभर टक्के महसूल जमा करण्याचे मोठे आव्हान महसूल विभागा समोर होते. ३६.९६ कोटीचे उद्दिष्ट वेळात पूर्ण झाल्याचे प्रशासनाने दिलेल्या अहवालात नमूद आहे. शासनाला राज्यातून जमिनीपासून मोठ्या प्रमाणात महसूल जमा होतो. त्यामुळे दरवर्षी जिल्हास्तरावर महसूल विभागाला उद्दिष्ट दिले जाते. मागील वर्षी कोरोना काळातही शेवटी उद्दिष्टपूर्ती महसूल विभागाने केली होती. मार्च एंडिंगचा हिशोब शासनाला द्यावा लागतो. त्यामुळे प्रशासनाकडून मार्च एंडिंगला पथके तयार करून उद्दिष्टपूर्तीकडे लक्ष केंद्रीत केल्या जाते. सन २०२१ - २२ या आर्थिक वर्षाकरिता जमिन महसूलचे उद्दिष्ट १५ कोटी ३० लाख असताना ३१ मार्चपर्यंत १९ कोटी ९९ लाख रूपये महसूल विभागाकडे जमा झाले आहेत. याची टक्केवारी १३०.७ इतकी आहे. याशिवाय संकिर्ण महसुलीचे २० कोटी ६० लाखांचे उद्दिष्ट असताना १६ कोटी ९९ लाख रुपयांची वसुली झाली आहे. याची टक्केवारी ८२.३६ आहे. त्यामुळे एकूण उद्दिष्ट ३५ कोटी ९० लाख रूपये असताना ३१ मार्चपर्यंत महसूल विभागाकडे ३६ कोटी ९६ लाख रूपये गोळा झाल्याची माहिती महसूलचे उपजिल्हाधिकारी रणजित भोसले यांनी दिली. ३१ मार्चपर्यंत उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याचा दावाही विभागाने केला होता तो पूर्ण झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.