आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन पं. स. सभापतींची निवडणूक:तहसीलदारांच्या नेतृत्वात दुपारी 2 वाजता बैठक

अमरावती14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील तीन पंचायत समितीच्या सभापतींची निवडणूक मंगळवार, २२ नोव्हेंबरला होत आहे. त्यासाठी तिवसा, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे पंचायत समितीमध्ये विशेष सभा बोलावण्यात आली आहे.

गेल्या ३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व चौदाही पंचायत समित्यांच्या सभापतिपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी प्रशासक नसलेल्या वरील तीन पंचायत समित्यांसाठीचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला. त्यानुसार मंगळवारी ही प्रक्रिया पूर्णत्वास जात आहे. प्राधिकृत अधिकारी या नात्याने त्या-त्या ठिकाणचे तहसीलदार यांच्या नेतृत्वात दुपारी २ वाजता ही बैठक सुरू होईल.

सूत्रांच्या माहितीनुसार, सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत उमेदवारी दाखल करणे, ती मागे घेणे आदी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. जिल्ह्यात सध्या या तीनच ठिकाणी पंचायत समित्यांमध्ये लोकप्रतिनिधी आहेत. इतर ११ ठिकाणी पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे तेथे प्रशासक राजवट आहे. जिल्ह्यात एकूण १४ पंचायत समित्या असून त्यापैकी धारणी, चिखलदरा या मेळघाटातील दोन पंचायत समित्यांची सभापतिपदे ही कायमस्वरुपी अनुसूचित जमातीसाठी (एसटी) आरक्षित आहेत.

बातम्या आणखी आहेत...