आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपत्ता:मतिमंद युवक तीन दिवसांपासून बेपत्ता

नांदगाव पेठएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शासकीय वसाहतीत राहणारा २७ वर्षीय गोलू तानोडे हा मतिमंद युवक गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झाला असून, शोधाशोध करूनही त्याचा शोध लागलेला नाही.

३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता गोलू तानोडे हा युवक परिसरातील भोलेनाथ चौकात बसला होता. आजूबाजूला कुठेतरी फिरायला गेला असेल म्हणून कुटुंबीयांनी लक्ष दिले नाही. मात्र त्यानंतर संपूर्ण दिवसभर शोधाशोध केली असता गोलू सापडला नाही. अखेर त्याच्या कुटुंबीयांनी नांदगाव पेठ पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी गोलू तानोडे याची शोधमोहीम सुरू केली. परंतु तीन दिवस उलटूनही गोलूचा शोध लागला नसल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सडपातळ बांधा, डोक्याचे केस बारीक, सावळा रंग व अंगात गुलाबी शर्ट तसेच निळ्या रंगाची हाफ पॅन्ट असा पेहराव असणारा युवक आढळून आल्यास नांदगाव पेठ पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...