आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकरावीच्या प्रवेशाकरिता प्रथम प्रवेश फेरीमध्ये पसंती क्रम नोंदवलेल्या ५ हजार ९२७ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना ३ ते ६ ऑगस्ट दरम्यान संबंधित विद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करावयाचे आहे.
शहरात अकरावी प्रवेशाकरिता ऑनलाइन केंद्रीय राबवली जात असून, याकरिता विद्यार्थ्यांना शहरातील विविध शाळांमध्ये प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन अकरावी प्रवेश समितीच्या वतीने करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केल्यानंतर याची पडताळणी समितीच्या वतीने करण्यात आली. यातुन गुणवत्ता यादी तयार करून त्यांची प्रसिद्धी मंगळवारी करण्यात आली आहे.
यामध्ये प्रथम प्रवेश फेरीमध्ये पसंती क्रम नोंदवलेल्या ५ हजार ९२७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी कोटा प्रवेश फेरीत ९९२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहे. तर उर्वरित ५ हजार ९२१ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून सुरू केले जात आहे. प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांना ६ ऑगस्ट ची डेड लाइन देण्यात आली .
प्रथमफेरी
शाखानिहाय प्रेवशाची स्थिती
कला शाखा ९९९
वाणिज्य शाखा ८५१
विज्ञान शाखा ३७७१
व्होकेशनल शाखा ३००
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.