आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या औचित्यावर उत्कृष्ट काम करणारे महावितरणचे जनमित्र व यंत्रचालक अशा जिल्ह्यातील २७ कर्मचाऱ्यांना मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांच्या हस्ते ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘विद्युत भवन’ अमरावती येथे पार पडलेल्या या सोहळ्याची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर वर्ष २०२१-२२ मध्ये उत्कृष्ट सेवा देणारे जनमित्र व यंत्रचालक अशा २७ कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पुष्प देऊन ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय वरूड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेश दाभाडे यांनी कर्तव्य बजावताना दाखवलेली कार्यतत्परता, कर्तव्यदक्षतेबद्दल त्यांचाही विशेष गुणगौरव करण्यात आला.
महावितरणची सेवा ही निरंतर चालणारी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून कामाप्रती असलेली निष्ठा कायम ठेवावी, असे प्रतिपादन करत मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी सन्मानित कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. अधीक्षक अभियंता दीपक देवहाते व कार्यकारी अभियंता आनंद काटकार यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेही अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, कार्यकारी अभियंते आनंद काटकर, भारतभूषण औघड, अनिरुद्ध आलेगावकर, राजेंद्र मळसने, नितीन नांदुरकर, सुहास देशपांडे, प्रदीप अंधारे, यज्ञेश क्षीरसागर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.