आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामीण भागाचा विकास करणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेच्या कामांवरही २ वर्षे कोरोनाचे संकट ओढावले. मात्र, कोरोना काळात ज्यांच्या हातातून काम गेले अश्यांनाही मनरेगाचा आधार मिळाला. दरवर्षी मनरेगाचे कोट्यवधी मनुष्य दिवस काम होत असते. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार यंदाही जिल्ह्यात १० कोटी २१ लाख ९ हजार ६१२ मनुष्य दिवस काम झाले आहे. यातील ३४ हजार १५१ कुटुंबांना शंभर दिवस काम मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात रोजगाराचे प्रमाण वाढले आहे.
मागेल त्याला काम देण्यासाठी केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंमलात आणली. या योजनेच्या माध्यामातून ग्रामीण भागातील रस्ते, पाणंद रस्ते, शेततळी, वनतळी, तलाव खोलीकरण, बांध खोलीकरणाचे काम केले जातात. अमरावती जिल्ह्यातील ३४ हजार १५१ कुटुंबांना रोहयोचे काम मिळाले.त्या कामांवर काम करणाऱ्या मजुरांची संख्या २ लाख ८२ हजार ३५४ होती. यातील मजुरांनी १० कोटी २१ लाख ९ हजार ६१२ मनुष्य दिवस काम केले आहे.
अचलपूर तालुक्यातील १ हजार २६६ कुटुंबातील १५ हजार ३९८ मजुरांनी ४ लाख ५७ हजार ३९९ मनुष्य दिवस काम केले. अमरावती तालुक्यातील ९३७ कुटुंबातील ८ हजार ० ७४ मजुरांनी ३ लाख १२ हजार ६०९ मनुष्य दिवस काम केले. तसेच अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ८९५ कुटुंबातील ८ हजार ८७६ मजुरांनी ३ लाख १८ हजार ३८८ मनुष्य दिवस काम केले. तर भातकुली तालुक्यातील ६३० कुटुंबातील ८ हजार ०३२ मजुरांनी २ लाख ३१ हजार २५७ मनुष्य दिवस काम केले. चांदूर रेल्वे तालुक्यात ४३७ कुटुंबातील ७ हजार ८८५ मनुष्य दिवस काम केले. तसेच चांदूर बाजार तालुक्यातील १ हजार ५७४ कुटुंबातील १५ हजार ६२ मजुरांनी ५ लाख ४२ हजार ९७४ मनुष्य दिवस काम केले.
चिखलदरा तालुक्यातील सर्वाधिक १४ हजार ५८७ कुटुंबातील ७२ हजार ४८० मजुरांनी ३७ लाख २९ हजार ३०३ मनुष्य दिवस काम केले. दर्यापूर तालुक्यातील १ हजार २४४ कुटुंबातील ११ हजार १८९ मजुरांनी ३ लाख ९६ हजार २१२ मनुष्य दिवस काम केले. त्याच सोबत धामणगाव तालुक्यात २९२ कुटुंबातील ८ हजार ०३३ मजुरांना १ लाख ५६ हजार ०१७ मनुष्य दिवस काम केले आहे. तसेच धारणी तालुक्यातील ६ हजार ६३८ कुटुंबातील ६५ हजार १५२ कामगारांनी १८ लाख ९६ हजार ४९४ मनुष्य दिवस काम केले, तर मोर्शी २ हजार ५६७ कुटुंबातील २२ हजार ९४५ मजुरांनी ८ लाख ५२ हजार ५२२ मनुष्य दिवस काम केले आहे.
त्याच बरोबर नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ४५९ कुटुंबातील १० हजार २७७ जणांनी २ लाख १४ हजार ७७५ मनुष्य दिवस काम आहे. तसेच तिवसा तालुक्यात १ हजार ३२ कुटुंबातील ९ हजार ११० मजुरांनी ३ लाख ३४ हजार ४९१ मनुष्य दिवस काम केले. त्याचसोबत वरुड तालुक्यातील १ हजार ५९३ कुटुंबातील १८ हजार ९४१ जणांनी ५ लाख ७३ हजार १५२ मनुष्य दिवस काम केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.