आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभरधाव दुधाच्या टँकरने दुचाकीला मागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील मागे बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला. ही रविवारी (दि. ११) कुऱ्हा ते आर्वी मार्गावरील मार्डा गावाजवळ घडली. नानाजी दामोधर चौधरी (वय ५८) असे अपघातात मृत्यू झालेल्या, तर डिगांबर अवधुत वानखडे (४५) रा. कव्हाडगव्हाण असे जखमीचे नाव आहे.
घटनेच्या वेळी डिगांबर वानखडे हे त्यांच्या दुचाकीने (एमएच २७/ एएन ६९९४) मृत नानाजी चौधरी यांना घेऊन आर्वीकडे जात होते. दरम्यान, त्याचवेळी मार्डा गावाजवळील बडकस यांच्या शेताजवळ आर्वीच्या दिशेने जाणाऱ्या दुधाच्या टँकरने (एमपी ०४/ जेबी ७१६७) दुचाकीला मागून जबर धडक दिली. घटनेची माहिती मिळताच कुऱ्ह्याचे ठाणेदार तागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर सपाटे यांनी टँकरचा पाठलाग करीत तो आर्वीत पकडला. मात्र चालक फरार झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.