आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे एक वक्तव्य चर्चेत आहे. पैठणमधील एका कार्यक्रमात त्यांनी महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात एक वक्तव्य केले, या वक्तव्याचे आता जिल्ह्यातही तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. आंबेडकरी चळवळीतील पक्ष, संघटना आक्रमक झाल्याचे सोमवारी पाहायला मिळाले. पाटील यांच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी मुख्य प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. यावेळी पाटील यांच्या विरोधात तीव्र नारेबाजी करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांच्यावर अँट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मुख्य मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान केले.
त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळलेली आहे. पाटील यांच्या निषेधार्थ अनेक आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटना रस्त्यांवर उतरल्याने दिसून येत आहे. पाटील यांच्यावर अँट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा, तसेच भीम सैनिक मनोज गरबडे यांच्यासह अन्य दोघांनी पाटील यांच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनानंतर ३०७, १२० - ब, ३५३ अन्वये गुन्हे दाखल केले. ते गुन्हे मागे घेण्यात यावे, तसेच या घटनेनंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले, त्यांच्यावरील निलंबनाची कार्यवाही मागे घेण्यात यावी, या मागणीला घेऊन सोमवारी विविध पक्ष ,संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी पाटील यांच्या विरोधात तीव्र नारेबाजी केली. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
यामध्ये भंते ज्ञानरत्न थेरो, भीम ब्रिगेड, आझाद समाज पार्टी, भीम आर्मी, शिवसेना, महाराष्ट्र युवा सेना, वंचित, जय संविधान, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, पब्लिक पार्लमेंट, ओबीसी महासभा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती, भारतीय बौद्ध महासभा, ऑल इंडिया पँथर सेना, रिपाई( गवई गट), खोरिपा, आंबेडकरी साहित्य अकॅडमी आदी पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.