आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांसंबंधी बेताल वक्तव्य केले. त्यांच्या या बेताल वक्तव्याबाबत सर्वत्र त्यांच्यावर टिकेची झाेड उठत आहे. राज्यपालांसह मंत्री पाटलांच्या या वक्तव्याचे वरुड शहरातही पडसाद उमटले आहेत. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ वरुड येथील बिरसा क्रांती दल, भारतीय बौद्ध महासभा, बिरसा ब्रिगेड, सत्यशोधक फाऊंडेशन, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, नागसेन बुद्ध विहार समिती व सम्यक युवा बहुद्देशीय संस्था यांच्या वतीने तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.
निषेध कृती समितीतर्फे काढण्यात आलेल्या या मोर्चाला वरुड शहरातील केदार चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून सुरूवात झाली. या प्रसंगी प्रवीण चौधरी यांनी मूक मोर्चाला संबाेधित केले. काही दिवसांपुर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते.
दरम्यान, नुकतेच पैठण येथे झालेल्या सभेत महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संबंधात अत्यंत बेताल व अपमानजनक वक्तव्य केले होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या पदावरून मुक्त करण्याची कारवाई मुख्याधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
या वेळी बिरसा क्रांती दलाचे जिल्हा संघटक प्रा. कमलनारायण उईके, समाज प्रबोधनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण चौधरी, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी मनोज बागडे, अरविंद गजभिये, गोपाल पाटील, बिरसा क्रांती दलाचे पदाधिकारी मनोज उईके, शंकर सिरसाम, अजय युवनाते, मुकेश धुर्वे, सोनू युवनाते, शीतल युवनाते, सुवर्णा धुर्वे, मनीष कुबडे, राहुल चौधरी, विक्की इंगळे, यशपाल जैन, निलेश माळोदे, राहुल लांडगे, अॅड. योगेश नागले, अरविंद वानखडे, संजय पाटील, हर्षद शेळके, सुशील बेले, मनोज लांडगे, प्रवीण कोहळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. मोठ्या संख्येने विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक या मूक मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.