आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळजनक!:मेळघाटात अत्याचार करून अल्पवयीन मुलीवर लादले मातृत्व; पीडितेने दिला मुलाला जन्म

अमरावती20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेळघाटातील धारणी तालुक्यात एका 17 वर्षीय मुलीवर परिचित तरुणाने वारंवार अत्याचार केला. यातून मुलीला गर्भधारणा झाली होती. दरम्यान पीडित अल्पवयीन मुलीने आता मुलाला जन्म दिला आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन धारणी पोलिसांनी सोमवारी (दि. 13) रात्री अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेला लग्नाचे आमिष

राहुल नारायण धुर्वे (22, रा. ता. धारणी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. राहुल धुर्वेची वर्षभरापुर्वी एका अल्पवयीन तरुणीसोबत ओळख झाली. त्यानंतर ओळखीतून मैत्री झाली. राहुलने अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दिले. यातूनच त्याने 9 सप्टेंबर 2021 ते 4 नोव्हेंबर 2021 दरम्यान मुलीवर वारंवार बलात्कार केला. यातूनच मुलीला गर्भधारणा झाली. दरम्यान या मुलीला काही दिवसांपुर्वी मेळघाटातील एका शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गुन्हा दाखल

या दरम्यान मुलीने एका मुलाला जन्म दिला आहे. कुमारी माता झाल्याचे लक्षात येताच वैद्यकीय सूत्रांनी पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी धारणी पोलिसांनी सोमवारी रात्री पीडित कुमारी मातेच्या तक्रारीवरुन राहुल धुर्वे याच्याविरुध्द विश्वासघात, बलात्कार तसेच पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...