आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपत्ता:तरुणी बेपत्ता; न्यायासाठी ठाण्यात ठिय्या

अमरावती9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बडनेरा येथील १९ वर्षीय मुलगी मागील दहा दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. तिला ज्या मुलाने पळवून नेले, त्याचे नावही मुलीने तिच्या कुटुंबीयांना फोनवरून सांगितले आहे. या प्रकरणी बडनेरा पोलिसांत कुटुंबीयांनी तक्रार दिली आहे, मात्र तरीही पोलिसांनी मुलीचा शोध घेतला नाही, असा आरोप करून भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांसह बडनेरा पोलिस ठाण्यात रविवार, २० नाेव्हेंबरला ठिय्या आंदोलन केले.

बडनेऱ्यातील विशिष्ट समुदायातील तरुणाने या मुलीला पळवून नेल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे. तत्काळ मुलीचा शोध घ्यावा, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली. या वेळी राजू शर्मा, किरण अंबाडकर, प्रदीप सोळंके, अन्नू शर्मा, संजय कटारिया, रवी मुळे, उमेश निलगिरे, रोशनी वाकडे, सतनाम कोर हुडा, टेकचंद केशवानी, शुभम खाजोने, विनय मोटवानी, शिवम भिंडा, स्वप्निल शर्मा, सुनील लोयबरे, संजय कटारिया, सागर पवार, संतोष मिश्रा, तुषार अंभोरे, नीलेश हिवराळे, श्रीकांत खंडारे, विशाल चव्हाण, प्रेम भैसने, आशू जोशी, नवीन यादव, सोनू पाताल बन्सी, विकास सुने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांनी बडनेरा ठाण्यात जाऊन ठिय्या आंदोलन करणाऱ्या भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. पोलिसांनी तत्काळ मुलीच्या शोधासाठी पथके रवाना केली.

बातम्या आणखी आहेत...