आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखंडेश्वर तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा आढावा बैठक आमदार प्रताप अडसड यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडली. या वेळी तालुक्यातील सरपंचांनी त्यांच्या गावातील पाणी समस्या प्रशासनासमोर मांडल्या. येणाऱ्या उन्हाळ्यात तालुक्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईवर कशाप्रकारे मात करता येईल, याबाबत बैठकीत चर्चा झाली. यावेळी खेड येथील सरपंचांनी प्रत्येक घरापर्यंत नळ पोहाेचवण्याची मागणी केली. तसेच गावातील पाझर तलावाचे खोलीकरण करून टंचाई दूर करता येईल, असे सुचवले. याचवेळी इतर सरपंच व उपस्थितांनी आपापल्या गावातील समस्या सांगितल्या.
या वेळी आमदार प्रताप अडसड यांच्यासह तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर, तालुका पशुवैद्यकीय तालुका अधिकारी गजानन मेश्राम, तालुका आरोग्य अधिकारी स्वप्निल मालखेडे, तालुका कृषी अधिकारी, भांडार अधिकारी विठ्ठल जाधव, पाणीपुरवठा उपअभियंता शुभम ढोके, रवींद्र मुंदे, दीपक तिखिले, संजय पोफळे, निकेत ठाकरे यांच्यासह तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.