आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील स्व. दत्तात्रय पुसतकर कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय निवासी शिबिर नांदुरा लष्करपूर येथे नुकतेच पार पडले. या शिबिराला तिवसा मतदार संघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी सदिच्छा भेट देऊन शिबिरातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवकांना उपयुक्त असे मार्गदर्शन करीत त्यांच्याशी संवाद साधला. रासेयो च्या सर्व स्वयंसेवकांनी कोणतेही काम करताना मन लावून करावे. परिस्थितीचा विचार न करता प्रामाणिकपणे प्रयत्न करीत यशाचा मार्ग सुकर करावा, असे मत आमदार ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी भारताच्या संविधानाचा अभ्यास करून भारतीय संविधानातील तत्त्वानुसार काम करणाऱ्यांचा सन्मान करावा आणि त्यानुसार आपणही काम करावे असा मोलाचा सल्लाही या वेळी दिला.
या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अलका देशमुख, नांदुरा लष्करपूर गावचे प्रतिष्ठित नागरिक व अमरावती तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष हरीशभाऊ मोरे, नांदुरा लष्करपूरचे सरपंच रघुनाथ सावळे, जितू ठाकूर, अमित गावंडे आणि इतर मान्यवर यांनीही शिबिराला भेट दिली. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. विजय दरणे यांनी आ. ठाकूर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. गोविंद तिरमनवार, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. सुनीता बाळापुरे, सह कार्यक्रमाधिकारी डॉ. सुभाष पवार, विनायक पावडे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.