आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:आमदार, माजी आमदारांनी केली रुग्णांची चौकशी

धामणगाव रेल्वे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बोरगाव धांदे येथे एकाच दिवशी ८० रुग्णांना डायरिया सदृश आजाराची लागण झाल्याचे निदर्शनास येताच प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून, दिवसभर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बोरगाव धांदे येथे भेटी दिल्यात, तर दुसरीकडे याबाबत माहिती मिळताच आमदार प्रताप अडसड तसेच माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी सुद्धा तातडीने बोरगाव धांदे येथे धाव घेत रुग्णांची आस्थेने विचारपूस करत परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी पंचायत समिती सभापती बेबी उईके, उपसभापती जयश्री शेलकर यांच्यासह अन्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

बोरगाव धांदे येथे डायरिया सदृश रुग्णांची लागण झाली असून दूषित पाण्याच्या पुरवठ्याने गावातील शंभरच्या जवळपास रुग्णांना मळमळ, उलटी पोट, दुखण्याच्या तक्रारी सुरू होताच आरोग्य यंत्रणेने तत्काळ उपाययोजना करत शाळेतच रुग्णांवर औषधोपचार सुरू करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. दरम्यान आ. अडसड, माजी आमदार जगताप यांनी अधिकाऱ्यांसह बोरगाव येथे भेट देत रुग्णांची चौकशी केली तसेच परिस्थितीचा आढावा घेतला. बोरगाव येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर यांच्या नेतृत्वात आरोग्य पथक कार्यरत आहे. संपूर्ण गावात औषधीचे वाटप करण्यात आले असून, आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या वेळी गटविकास अधिकारी, सरपंच श्रुती उईके, पंकज वानखडे, मनोज डहाके, संजय विंचुरकर, रामभाऊ धांदे, स्वप्निल धांदे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...