आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा नियोजन समितीची फेररचना:आमदार, पक्ष पदाधिकाऱ्यांसह 15 जणांची वर्णी काँग्रेसला सर्वाधिक 7, सेना-राष्ट्रवादीला प्रत्येकी 3 जागा

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याच्या एकूण विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) फेररचना करण्यात आली असून त्यातील विशेष निमंत्रित सदस्यांच्या 11 जागांसह 15 नव्या पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. नूतन 15 पदाधिकाऱ्यांमध्ये काँग्रेसला सर्वाधिक 7 जागा मिळाल्या असून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 3 तर उर्वरित दोन जागांवर अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

विधानमंडळ किंवा संसद सदस्यांमधून नियुक्त करावयाच्या 2 जागांवर अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके आणि दर्यापूर-अंजनगाव सुर्जीचे आमदार बळवंतराव वानखडे यांची निवड करण्यात आली आहे. त्याचवेळी जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले नामनिर्देशित सदस्य या संवर्गातून माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप आणि शिवसेनेचे राजेश वानखडे यांना स्थान देण्यात आले आहे. याशिवाय उर्वरित 11 सदस्यांमध्ये जिल्हा बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड, माजी महापौर विलास इंगोले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गिरीश कराळे व सतिश हाडोळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे व दिनेश बूब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे, संतोष महात्मे व भास्करराव ठाकरे आणि अल्पसंख्यक समाजातील मोहम्मद सईद मोहम्मद सादिक व मुजफ्फर हुसेन शेख रेहमतुल्लाह यांची निवड झाली आहे.

जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर ह्या डीपीसीच्या अध्यक्ष आहेत. तर जिल्हाधिकारी पवनीत कौर सदस्य सचिव असून खासदार-आमदारांसह जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती यातून पाठविलेल्या प्रतिनिधींद्वारे डीपीसीचे कामकाज चालविले जाते. डीपीसीची बैठक दर तीन महिन्यातून एकदा घेतली जावी, असा प्रघात आहे. परंतु वर्षभरात फार तर या समितीच्या तीन बैठकी घेतल्या जातात.

आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वी त्या वर्षासाठीचे अंदाजपत्रक निश्चित करणे आणि त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षांचा लेखा-जोखा निश्चित करणे यासाठी सदर समितीच्या सर्व सदस्यांची जानेवारीच्या आसपास बैठक घेतली जाते. त्यानंतर सप्टेबर-आक्टोबरच्या आसपास होणाऱ्या बैठकीत चालू वर्षाच्या खर्चाचा आढावा घेतला जातो. एरवी सदस्य सचिव या नात्याने जिल्हाधिकारी वेळोवेळी डीपीसीशी संबंधित अधिकाऱ्यांच्या व लघुगटाच्या बैठका घेत असतात. नव्याने निवड झालेले सदस्य या सर्व बैठकांमध्ये सहभाग नोंदवून नवे विषय सूचवू शकतात.

बातम्या आणखी आहेत...