आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग:बँक कर्मचारी महिलेचा विनयभंग; पतीलाही मारली चापट

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका राष्ट्रीयकृत बँकेच्या मुख्य शाखेत कार्यरत एका महिला कर्मचाऱ्याला मागील काही दिवसांपासून एक २९ वर्षीय युवक छेडत आहे. तिचा पाठलाग करणे, धमकी देणे आदी माध्यमातून तो महिलेचा विनयभंग करत आहे. दरम्यान, महिलेच्या पतीने त्याला हटकले असता पतीला सुद्धा त्याने चापट मारली. या प्रकरणी पीडित महिलेने शनिवारी (दि. १९) कोतवाली पोलिसांत त्याची तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

मोहम्मद अब्दुल्लाह (२९, रा. माता लाईन, छायानगर, अमरावती) असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. पीडित महिला कार्यरत असलेल्या बँकेत मोहम्मद अब्दुल्लाह याचे खाते आहे. अनेकदा काम नसताना तो बँकेत जातो. पीडितेसह बँकेतील महिला कर्मचाऱ्याकडे तो एकटक पाहतो. हा कार्यक्रम त्याचा मागील महिनाभरापासून सुरू आहे. दरम्यान, १९ मार्चला पैसे काढण्याच्या बहाण्याने त्याने पीडितेच्या हाताला स्पर्श केला. तसेच पिडीता बँकेत ये - जा करताना मोहम्मद अब्दुल्लाह तीच्यावर लक्ष ठेवून राहतो. याबाबत पीडितेने तिच्या पतीला सांगितले त्यामुळे पीडितेच्या पतीने मोहम्मद अब्दुल्लाहला समजावण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी त्याने पीडितेच्या पतीला चापट मारुन त्यालाच पाहून घेण्याची धमकी दिली तसेच पीडितेलासुद्धा तू माझ्यासोबत बोलली नाहीतर तुला मारुन टाकेल, अशी धमकी दिली. बँकेतील एका वरिष्ठाने त्याच्यावर लक्ष दिले तर त्यालाही मारण्याची धमकी दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी मोहम्मद अब्दुल्लाहविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...