आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवे मारण्याची धमकी:मुलीचा विनयभंग; जाब विचारणाऱ्या आईला मारहाण‎

अमरावती25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारणी पोलिस‎ ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका‎ सतरा वर्षीय मुलीच्या घरात‎ जाऊन एका व्यक्तीने तिचा‎ विनयभंग केला. याबाबत मुलीने‎ तिच्या आईला सांगितले. त्यामुळे‎ मुलीच्या आईने त्याला हटकले‎ असता त्याने मुलीच्या आईला‎ लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या‎ प्रकरणी अल्पवयीन पीडितेच्या‎ तक्रारीवरुन पोलिसांनी गुरूवारी‎ (दि. २) गुन्हा दाखल केला.‎ संदीप तोटे (रा. धारणी) असे‎ गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे‎ नाव आहे. पीडितेने दिलेल्या‎ तक्रारीनुसार, संदीप तोटे याची‎ पीडित मुलीच्या आईसोबत‎ चांगली ओळख होती, त्यामुळे तो‎ मुलीच्या आईला भेटण्यासाठी‎ नेहमीच तिच्या घरी ये-जा‎ करायचा.

तो ७ जानेवारीपासून‎ अल्पवयीन मुलीला शाळेत येताना‎ जाताना त्रास देतो तसेच एक‎ दिवस मुलीच्या घरी गेला. मुलीची‎ आई घरी नव्हती, त्यामुळे मुलीने‎ त्याला आई घरी नसल्याचे‎ सांगितले. तरीही तो जबरीने घरात‎ घुसला व त्याने विनयभंग केला.‎ याबाबत कोणालाही न‎ सांगण्याबाबत त्याने मुलीला‎ धमकी दिली. दरम्यान, मुलीने हा‎ प्रकार तिच्या आईला सांगितला.‎ त्यामुळे मुलीच्या आईने त्याला‎ हटकले तर त्याने मुलीच्या आईला‎ लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.‎ तसेच जीवे मारण्याची धमकी‎ दिली.‎ या प्रकरणी पीडित मुलीच्या‎ तक्रारीवरुन पोलिसांनी संदीप‎ तोटेविरुद्ध विनयभंग, पोस्को‎ तसेच धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा‎ दाखल केला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...