आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनात मंगळवार, 6 डिसेंबर रोजी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणभूमी स्मारक समितीच्यावतीने एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चात अमरावती जिल्ह्यातून शेकडो चर्मकार समाजबांधव सहभागी होत असून ते बडनेरा रेल्वे स्टेशनवरून दिल्लीकरिता रवाना झाले आहेत. जिल्हाध्यक्ष निलेश जामठे यांच्या नेतृत्वात हा जत्था आज, रविवारी सकाळी दिल्लीकडे निघाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणभूमी सम्मान कार्यक्रम समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री इन्द्रेश गजभिये आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून त्यात देशभरातील विविध राज्यातील चर्मकार बांधव सहभागी होणार आहेत. 26 अलीपुर रोडवरील दिल्ली येथील महापरिनिर्वाणभूमी स्मारकाच्या शेजारी असलेले पडीक बंगले सरकारने ताब्यात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण भूमी स्मारकाचा विस्तार करावा, या स्मारकाला राजघाटाचा दर्जा मिळावा आणि जागतिक विश्वकोशाच्या सुचिमध्ये सदर स्मारकाची नोंद करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे.
या आंदोलनासाठी जिल्हाध्यक्ष निलेश जामठे यांच्यासह सचिव विजय शेकोकार, जिल्हा उपाध्यक्ष जगदेव रेवसकर, अचलपुर तालुका अध्यक्ष मनोहर कोथळकर, दर्यापुर तालुका अध्यक्ष वसंतराव रेवसकर, तिवसा तालुका अध्यक्ष नरेंद्र काकडे, राजकुमार पिंजरकर, चांदुरबाजार तालुका शाखेचे सचिव विश्वंबर तायडे, युवा आघाडी अध्यक्ष अविनाश तायडे, गठई कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिलीप वारजे, सागर सिसोदिया, किशोर पाचखंडे, संजय पिंजरकर, समर्थ काकडे, रवींद्र वानखडे, किरण पानझाडे, हरिष मेसकर, जगन्नाथ वारजे, मनोहर थोटे, चेतन पचारे, नागेश भानगे, अभिजीत पिंजरकर, अनुभुती पिंजरकर, प्रतीक्षाताई पिंजरकर, वनमालाताई काकडे आदिसह शेकडो पदाधिकारी रवाना झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.